नैसर्गिक खा आणि शतायुषी व्हा

रोगमुक्त शतायुषी आयुष्याचा राजमार्ग... 

            खूप लोकांची ईच्छा असते कि, आपल्याला निरोगी आयुष्य जगता यायला हवं. पण आजच्या या धकाधकीच्या जीवनात ते शक्य झालेलं नाही. आज आपल्यापैकी बरेच जण काही ना काही आजार, व्याधींनी ग्रस्त आहेत. वैद्यकीय उपाचारांवर लाखो रुपये खर्च करत आहेत. पण या दुखण्यातून अपेक्षित उपचार मिळत नाहीत. आजार पूर्ण बरा होणे तर सोडाच, कमी देखील होत नाही.


     यावर तुम्हाला रामबाण उपाय हवा आहे का ? 

     मग हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे.

     पण तो शेवटपर्यंत वाचून, समजून घेतलात, तर असलेल्या आजार, व्याधीतून मुक्त व्हालच, पण भविष्यात कधीच तुम्हाला डॉक्टरच्या दवाखान्याची किंवा हॉस्पिटल ची पायरी चढावी लागणार नाही.

     आजच्या तारखेला जवळपास ६० ते ६५% लोक हे काही ना काही आजाराने त्रस्त आहेत आणि त्यातील साधारण १० पैकी १ व्यक्ती ही कॅन्सरग्रस्त आहे. तसेच प्रत्येक १५ कॅन्सरग्रस्त व्यक्तींपैकी दररोज १ व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू होत आहे. 

     मी जेंव्हा याचं कारण शोधण्यास सुरुवात केली, तेंव्हा माझ्या असं लक्षात आलं कि, आपण रोज जो आहार घेतोय , जे अन्न ग्रहण करतोय, ते विषयुक्त आहे.

     वाचून धक्का बसला ना ?

     पण दुर्दैवाने हे कटू सत्य आहे. आपण घेत असलेल्या आहाराच्या प्रत्येक घटकांमधून, आपण रोजच्या रोज थोडं-थोडं विष प्राशन करत आहोत आणि हे अगदी बेमालूमपणे होत आहे. कारण मानवी स्वभावानुसार प्रत्येक गोष्ट खरेदी करताना, ती स्वस्त कुठे आणि कशी मिळेल, हेच आपण शोधत राहतो आणि आपली हिच सवय, आपल्याला कधी जीवघेण्या आजारात आणि पर्यायाने वैद्यकीय उपचारांवरील भरमसाठ खर्चात गुंतवते, हे आपल्या लक्षात देखील येत नाही.

     हो, स्वस्त मिळणारा भाजीपाला, कडधान्य, फळ-फळावळ हि एक तर सर्व रासायनिक शेतीतून आलेली उत्पादनं आहेत किंवा ती गलिच्छ सांडपाण्याच्या वापरातून केलेल्या शेतीची उत्पादनं आहेत . कमीत कमी वेळात भरपूर उत्पादन काढून, बक्कळ पैसा कमावण्याच्या नादात, काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील उत्पादनात जी काही रासायनिक खतं आणि जंतूनाशकं वापरली, ती काही प्रमाणात या उत्पादनात मुरतात. त्या उत्पादनातून ती आपल्या शरीरात जातात आणि हळूहळू  एका महा व्याधीमध्ये किंवा जीवघेण्या रोगात परिवर्तित होतात.

     यावर उपाय म्हणजे असं अन्नधान्य, जे रासायनिक खतं आणि जंतु नाशकाशिवाय उत्पादित करण्यात आलेलं असेल आणि म्हणूनच ते संपूर्ण विषमुक्त असेल.

     नमस्कार, मी अरुण सहदेव गोसावी, तुमचा विषमुक्त अन्नदाता. नैसर्गिक खा आणि शतायुषी व्हा, या मंचाचा संस्थापक. येत्या ५ वर्षात, कमीत कमी ५००० कुटुंबियांना नैसर्गिक अन्न पुरवठा करून त्यांचे आयुष्यमान वाढवणे, हा माझा ध्यास आहे.

     या विषयी अधिक जाणून घेण्यासाठी माझा FB गृप जॉईन करा.

     मित्रांनो, बरेच शेतकरी आता रासायनिक शेतीकडून अश्या शेतीकडे वळत आहेत, ज्यात रासायनिक खतं किंवा जंतुनाशकांचा वापर अजिबात केला जात नाही आणि  जी पूर्णपणे नैसर्गिक निविष्ठांचा वापर करूनच केली जाते.

     अर्थात, मी नैसर्गिक शेती आणि त्याच्या उत्पादनाबद्दलच बोलतोय. तुम्ही जर नैसर्गिक शेतीतून उत्पादित झालेलं अन्नधान्य, भाजीपाला आणि फळफळावळ यांचा तुमच्या रोजच्या आहारात वापर करण्यास सुरुवात केलीत, तर तुम्हाला आयुष्यात कधीच कोणताही आजार होणार नाही आणि देव न करो, जर तुम्हाला कोणताही आजार असलाच, तर तो नैसर्गिक शेतीत तयार झालेल्या अन्नधान्याच्या सेवनाने हळूहळू कमी होत जाऊन, कालांतराने पूर्णपणे बरा होऊ शकतो.

         नैसर्गिक शेती, म्हणजे ज्या शेतीमध्ये झाडांचा पालापाचोळा आणि आपल्या देशी गायी च्या शेणाचा वापर खत म्हणून आणि गोमुत्राचा वापर जंतूनाशक म्हणून केला जातो. हे खत जमिनीत मुरल्यावर त्याच्या वासाने जमिनीत खोलवर असलेले गांडूळ जमिनीच्या पृष्ठ भागाकडे आकर्षिले जातात. त्यांच्या खालून वर येण्याच्या प्रक्रियेमुळे जमीन नैसर्गिक रित्या नांगरली जाते व शेतातील भाज्यांच्या किंवा रोपांच्या मुळांना जमिनीच्या आत ऑक्सिजनचा पुरवठा होतो. त्यामुळे त्यांची वाढ झपाट्याने व चांगल्या पद्धतीने होते. शेणातल्या इतर जिवाणूंमुळे शेतीला उपयुक्त इतर नैसर्गिक घटक देखील मिळतात. पोषक आहार मिळाल्यामुळे पिकांची रोग प्रतिकारक शक्ती देखील वाढते. त्यांना कीड लागत नाही, त्यामुळे जंतूनाशक वापरण्याची आवश्यकता भासत नाही. अश्या शेत जमिनीत तयार झालेले अन्नधान्य अत्यंत पौष्टिक आणि चवदार असते. ज्यांनी ज्यांनी ते खाल्लं आहे ते निरोगी आणि दीर्घायुषी झाले आहेत. 

     बरेच शेतकरी, लोकांचं आरोग्य सुधारून त्यांना निरोगी आणि दीर्घायुषी आयुष्य जगता यावं म्हणून नैसर्गिक शेती करत आहेत आणि माझ्यासारखे तरुण नैसर्गिक शेतीतील उत्पादनाचा लाभ जास्तीत जास्त लोकांना घेता यावा आणि त्यांचं आयुरारोग्य अबाधित रहावं, म्हणून जनजागृती करत आहेत.

     पुरातन काळात याच पद्धतीचा वापर करून पिकं घेतली जात. जी पूर्णपणे नैसर्गिक आणि बिनविषारी होती. ज्याचं सेवन करून आपले पूर्वज ८० ते १०० वर्षे निरोगी आयुष्य जगत होते. आपले आजी - आजोबा देखील कमीत कमी ८० -८५ वर्षांपर्यंत आपले मूळ दात आणि डोळे शाबूत ठेवून जगले होते. 

     थोडक्यात, रोगमुक्त शतायुषी आयुष्याचा राजमार्ग हा नैसर्गिक शेतीच्या शेतातूनच जातो . त्यामुळे शपथ घ्या कि ,आजपासून मी नैसर्गिक शेतीत तयार झालेलं अन्नच खाईन आणि रोग आणि आजारांना दूर ठेवून शतायुषी होईन. 

     हा ब्लॉग पूर्णपणे वाचल्याबद्दल धन्यवाद. या ब्लॉग संबंधी आपले काही प्रश्न असतील, तर Comment मध्ये जरूर कळवा. तसेच LIKE आणि SHARE करा.

     माझे यापुढील ब्लॉग आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी माझ्या नैसर्गिक खा आणि शतायुषी व्हा या फेसबुक गृपला LIKE करा आणि माझ्या याच नावाच्या यु-ट्यूब  चैनल ला SUBSCRIBE करा.

     मी स्वतःला खूप भाग्यशाली समजतो कि, मी आज तुम्हाला तुमच्या दीर्घायुषी आयुष्याच्या वाटचालीकडे नेणारा मंत्र दिला आहे.